
बेळगाव : मूळच्या केळकर बाग येथील व सध्या आदर्शनगर येथील रहिवासी बानुताई रामचंद्र जोशी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले.
निधनाची बातमी समजताच त्यांचे भाचे उमेश जोशी यांना जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांनी देहदानाबद्दल माहिती दिली त्यानुसार त्यांनी होकार देताच जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरिरशास्त्र विभागाशी संपर्क साधून देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
बानूताई जोशी यांनी सरकारी इस्पितळात परिचारिका म्हणून काम केले होते. त्या एक उत्कृष्ट गायिका होत्या. दोनशेहून अधिक नाट्यगीते भक्तिगीते त्यांना तोंडपाठ होती. अलीकडेच वयाच्या नव्वदीतही त्यांनी वरिष्ठांच्या अखिल भारतीय गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांक पटकाविला होता.
त्यांच्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात एक बहिण आणि भाचा आहे.
जायंट्स आय फौंडेशन आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जोशी कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta