
बेळगाव : बालवीर विद्यानिकेतनमध्ये प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण दिन संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तेजल पाटील, एस. एन. जाधव, गोविंद गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. परिसर हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असून त्याचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एक तरी झाड लावूया आणि त्याचे संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखूया असा संदेश प्रमुख अतिथी तेजल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर शाळेच्या आवारात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश गवंडी या विद्यार्थ्याने केले तर आभार अक्षरा गुरव या विद्यार्थिनींनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta