
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक शिक्षिका शामला चलवेटकर उपस्थित होत्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे, असे मनोगत प्रमुख पाहुण्या शामला चलवेटकर यांनी व्यक्त केले.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन धीरजसिंह राजपूत यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta