
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे युद्ध स्मारक गार्डन, हिंदवाडी, बेळगाव येथे एक विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
केवळ २ तासांमध्ये ३५ हून अधिक रोपे लावण्यात आली. खड्डे खोदणे आणि झाडे लावण्याचे सर्व काम सदस्यांनी स्वतः उत्साहाने पार पाडले.
सार्वजनिक जनजागृतीसाठी बॅनर्सच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. “तुम्ही आज झाड लावा, पुढची पिढी त्याचा फायदा घेईल.”
या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी समूहाची बांधिलकी स्पष्ट दिसून आली. अध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष तानाजी शिदे, सदस्य प्रशांत सुगंधी, अभिषेक वाईनगडे, अजित तडकोड, भावेश पाटील, आरुश कामत, फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीधन मुळीक, सचिव प्रवीण त्रिवेदी, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta