
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
मागील ८ वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून २०२५ साली सुद्धा सीमाभागातील सर्व मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या १लीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवीत आहोत. तरी शाळा मुख्याध्यापक–शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थी किंवा सदर गावातील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या इयत्तेच्या पटसंख्येची यादी १५ जून २०२५ पर्यंत युवा समितीच्या पदाधिकाऱ्याकडे वॉट्सअप द्वारे किंवा खालील नमूद पत्त्यावर सुपूर्द करावी.
(पटसंख्या वाढलेल्या शाळांचा सन्मान : मागील शैक्षणिक वर्षापेक्षा यावर्षी ज्या शाळांची पटसंख्या वाढली आहे त्या शाळांचा विशेष सन्मान महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.)
कार्यालयीन पत्ता
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय
कावळे संकुल, आर.पी.डी. दुसरा क्रॉस, टिळकवाडी बेळगाव
संपर्क
अंकुश केसरकर (अध्यक्ष) 9739963229
श्रीकांत कदम (सरचिटणीस) 9611756529
सिद्धार्थ चौगुले 7338097882
प्रतिक पाटील 7338145673
आशिष कोचेरी 9886103373
निखिल देसाई 9902808280
आकाश भेकणे 7204651586
Belgaum Varta Belgaum Varta