
येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर, संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळूरमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक व सहाय्यक शिक्षक एन. वाय. मजूकर व शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांच्या हस्ते शाळेच्या आवारात विविध वनस्पतींचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण दिनाचे महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितले, तसेच विज्ञान शिक्षक श्री. वाय. बी. कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाबद्दल मार्गदर्शन केले व संदेश दिला की “झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा”. या कार्यक्रमाला प्रायमरीचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत हायस्कूलचा शिक्षक वर्ग व प्रायमरीचा संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta