
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांच्या निधनाच्या शोक प्रित्यार्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी सायं. ४.३० वा. मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मराठी विद्यानिकेतन, मराठा महिला मंडळ, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी व मराठी विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोकसभा होणार आहे . शीतल बडमंजी गेली २८ वर्षे मराठी विद्यानिकेतनमध्ये गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. उत्तम वक्त्या, निवेदक व सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. मराठी भाषा संवर्धन, शिक्षक प्रशिक्षण शिबीरे, महिलांचे सामाजिक प्रबोधन याबाबत त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta