
बेळगाव : सप्टेंबर महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या एशियन रोलर स्केटिंग स्पर्धेत भारतीय संघात निवड झालेल्या बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर देवेन बामणे याचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार कर्नाटक राज्याचे क्रीडा अधिकारी श्री. चेतन आर. आय पी एस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी देवेनला भारतीय संघामध्ये निवड झालेबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सत्कार बंगलोर येथील क्रीडा भवन येथे पार पडला. यावेळी कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. इंदूधर सीताराम, देवेनचे आई वडील विनोद बामणे, ज्योती बामणे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे इतर स्केटर्स व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta