Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव भाजप मंडळाच्या वतीने विजयोत्सव साजरा

Spread the love


बेळगाव : ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४ राज्यात विजय मिळविल्याने बेळगाव भाजप उत्तर मंडळाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपुर मोठा विजय प्राप्त केला असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके लावून स्वीट पाठवून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप उत्तरचे अध्यक्ष विजय कुडकनवर, जनरल सेक्रेटरी मृगेंद्रगौडा पाटील तसेच नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, धोनी, पुंडलिक, जयतीर्थ सौंदत्ती, प्रवीण पाटील, शरद पाटील, शिल्पा केकरे, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *