
अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात ५ वर्षाच्या मुलाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गिद्दप्पा वड्डर (वय ५) असे त्या मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मनोज घराबाहेर खेळत असताना नजीकच असलेल्या विहिरीजवळ गेला अन् पाय घसरल्याने तोल जाऊन तो विहिरीत पडला. यावेळी घटनास्थळी कोणीच नसल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर मनोजच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta