Wednesday , December 10 2025
Breaking News

बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जीम ओनर्स असो. पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : जीमच्या माध्यमातून बेळगाव मधील युवक युवतीना व्यसनापासून दूर ठेवून त्यांची शरीरयष्टी घडवणे व्यायामपटू घडवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज बेळगावत 120 हून अधिक जिम उभारणी केलेली आहे. कोणत्याही संघटनेने व्यायाम पटूना स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू नये असे आम्ही आवाहन करीत आहोत असे उद्गार जिम असोसिएशनचे अध्यक्ष चेतन तहसीलदार यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन व स्पोर्ट्स च्या वतीने बेळगाव जिल्हा जिम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यालयात करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विकास कलघटगी, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, सचिव राजेश लोहार, कार्याध्यक्ष अनिल आंबरोळे, खजिनदार नारायण चौगुले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन पदाधिकारी अध्यक्ष चेतन तहसीलदार, सचिव क्रितेश कावळे, जीम ओनर्स संस्थेचे संस्थापक किरण कावळे, उपाध्यक्ष नागेंद्र मडिवाळ, उपाध्यक्ष राकेश वाधवा, उपखजिनदार विजय चौगुले, खजिनदार सचिन मोहिते, उपखजिनदार जय निलजकर, विशाल चव्हाण, उपसक्रेटरी जय कामू, दयानंद निलजकर, शेखर जानवेकर, किरण पाटील, संचालक राजकुमार बोकडे, सुरेश धामणेकर, अश्विन हिंगणावर, सलमान के, यश गस्ती आदींचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी अस्मिता क्रियेशनचे संतोष सुतार, सुनील चौधरी, सुनील बोकडे, रणजीत किल्लेकर, भरत बाळेकुंद्री, राजू पाटील, विनोद मेत्री, पवन हसबे, तुषार कवाडे, विशाल गवळी, गुरुनाथ बेडारे, ऐश्वर्या कुरंगी, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *