Thursday , March 5 2026
Breaking News

गायरान जमीन क्रीडांगणाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध

Spread the love

बेळगाव : येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांसाठी गुरांसाठी राखिव असलेली 66 एकर 17 गुंठे जमिनीपैकी 40 एकर जमीन युवा सबलीकरण व क्रीडा खाते क्रीडांगण निर्मितीसाठी सरकारने मंजूर करण्यात आली आहे ही जमीन क्रीडांगणासाठी घेतल्यास गावातील गुराढोरांचे हाल होणार आहेत. गावामध्ये दोन हजार 700 जनावरे आणि 350 इतर पाळीव प्राणी आहेत गावची लोकसंख्या 18000 आहे तर 80 टक्के लोक शेतकरी असून यांना गायरान जमिनीची आवश्यकता आहे. यामुळे शेतकरी व ग्रामस्थना जनावरांसाठी त्रास सहन करावा लागणार आहे.
यासाठी या जमिनी ऐवजी दुसरी जमीन सरकारने घेऊन या ठिकाणी क्रीडांगण निर्मिती करण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही त्यामुळे गावातील गुरांचा विचार करा व दुसऱ्या जमिनीवर क्रिडांगणाची निर्मिती करा, असे ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *