बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. अशी माहिती प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी आपल्या मनोगतात दिली. विद्यार्थ्यांनी प्राणायाम, योगासनांचे वेगवेगळे प्रकार यांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, श्रीधर बेन्नाळकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, सविता पवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सृजन पाटील या विद्यार्थ्याने मानले.
Belgaum Varta Belgaum Varta