Sunday , July 26 2026
Breaking News

निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा : खासदार जगदीश शेट्टर

Spread the love

 

बेळगाव : आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी योगाभ्यास अत्यंत उपयुक्त आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिरता राखता येते. आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश केल्यास निरोगी जीवन घडवता येते, असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, जिल्हा आयुष विभाग आणि इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजित “११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन” कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार शेट्टर म्हणाले की, यंदा “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या घोषवाक्यासह योग दिन साजरा केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. आज जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाची सुरुवात केली. जगातील सर्व राष्ट्रांतील नागरिक योग दिनात सहभागी होत आहेत. आरोग्यात उत्तम बदल घडवून आणण्यासाठी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले आहे, असेही त्यांनी सांगितले. के.एल.ई. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या योग प्रशिक्षक आरती संकेश्वरी यांनी यावेळी योगाच्या विविध आसनांबद्दल प्रशिक्षण दिले. यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत प्रकल्प संचालक रवी बंगारप्पनवर, पर्यटन विभागाच्या संयुक्त संचालक सौम्या बापट, एअरफोर्स लेफ्टनंट कर्नल निकिता सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. सोबर्दा, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुणधोळी यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी या योग कार्यक्रमात सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *