
बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेस च्या वतीने अकरावा योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून 90 वर्षीय वसंतराव नाईक हे उपस्थित होते तर व्यासपीठावर योगगुरु शंकरराव कुलकर्णी, माधव पुणेकर व अनंत लाड हे उपस्थित होते.
रोजच्याप्रमाणे योगासने व सूर्यनमस्कार घातल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना वसंतराव नाईक यांनी नित्य नियमित योगा करण्याचे फायदे सांगितले. तर प्रत्येकाने योगा करून आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे असे श्री कुलकर्णी सर म्हणाले. याप्रसंगी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून योगा दिनाचे महत्त्व सांगितले. शिवशंकरी नायक व संदीप मोरे यांचीही भाषने झाली. शिवाजी मुचंडी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी अनेक योगसाधक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta