
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराजवळील तलावात एकाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. सचिन पाटील (वय ४६, रा. भांदूर गल्ली, बेळगाव) असे या युवकाचे नाव आहे. सचिन हा अविवाहित होता. कपिलेश्वर मंदिराजवळील तलावात एकाचा मृतदेह तरंगताना दिसला. यामुळे आजूबाजूच्या लोकांनी खडेबाजार पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली. सदर युवकाने आत्महत्या केली की पाय घसरून पडला याचा तपास खडेबाजार पोलिस करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta