
बेळगाव : गोरगरीब जनता बचत करून पैसे संस्थेमध्ये ठेवते. त्यामुळे या पैशांचा योग्य विनिमय करून त्याचा मोबदला ठेवीदारांना देणे गरजेचे आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता असणेही आवश्यक आहे, संस्थेच्या संचालकांची ठेवीदार, सभासदांना विश्वासात घेऊन कार्य केले तरच संस्था विश्वासास पात्र ठरेल आणि संस्था प्रगतीपथावर जाईल, असे प्रतिपादन काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.


मण्णूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या मातोश्री सौहार्द सहकारी संघ (सोसायटी)चे रविवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी श्री. पोतदार बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन आर. एम. चौगुले होते. प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. ए. एम. गुरव होते. यावेळी मातोश्री सभागृहाचे उद्घाटन एन. एस. चौगुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण माजी आमदार मनोहर किणेकर, कॅश काउंटरचे उद्घाटन प्रकाश मरगाळे, संगणकाचे पूजन कुलदीप हंगिरगेकर, लॉकरचे पूजन माजी महापौर मालोजी अष्टेकर, पतसंस्था फलकाचे अनावरण हर्षवर्धन इंचल यांच्या हस्ते झाले.
आंबेवाडी अध्यक्षा ग्रामपंचायतीच्या लक्ष्मी यळगुकर, संजीवनी, फाउंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनहाळ, रेखा चौगुले, रूपाली जनाज, मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनी दीपप्रज्वलन केले.
व्हाईस चेअरमन शांतिसागर कटगेन्नावर, संचालक शंकर सांबरेकर, सचिन मंडोळकर, महेश चौगुले, मनीष कालकुंद्री, परशराम काकतकर, ज्योती मंडोळकर, अन्नपूर्णा चौगुले, नारायण नाईक, सतीश बोंगाळे, शंकर आप्पुगोळ, बाबू कांबळे यांच्या हस्ते स्वागत झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रा. अरविंद पाटील व प्रकाश बेळगुंदकर यांनी सूत्रसंचालन केले.

Belgaum Varta Belgaum Varta