
बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहराचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
आमदार आसिफ सेठ यांनी आज बेळगावातील किल्ला तलाव, अमन नगर, महावीर नगर आणि पंजी बाबा परिसरात भेट देऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे निर्माण झालेल्या समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.
किल्ला तलावात पावसाचे पाणी वाढल्यास बाजूच्या वस्त्यांमध्येही पाणी शिरत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आमदारांनी तातडीने येथील गटार साफ करून समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, आपत्कालीन स्थितीत लोकांना मदत करण्यासाठी आपण नेहमी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवा नेते अमान सेठ, बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी., सहाय्यक कार्यकारी अभियंता अंकित राजेंद्र, अनुप कानोज, लक्ष्मी सुळगेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta