
बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत.
बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या रोटरी सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. अतिशय उत्साही वातावरणात ठाणे जिल्ह्याचे माजी प्रांतपाल डॉ. गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक पार पडली.
रोटे अशोक हे डिस्ट्रिक्ट 3170 कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा ह्या तीन राज्याचे गव्हर्नर म्हणून 2027- 28 साली कार्यरत असतील. आंतरराष्ट्रीय रोटरीची स्थापना 1905 साली झाली आहे आणि आज 120 वर्षाच्या इतिहासामध्ये बेळगांव मधून आता पर्यंत फक्त 9 रोटरियनची गव्हर्नर म्हणून काम केले आहे.
अशोक नाईक हे बेळगांव मधून निवडून आलेले 10 वे गव्हर्नर आहेत. अत्यंत महत्त्वाच्याआणि मानाच्या पदासाठी निवडून आल्याबद्दल श्री. अशोक नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अशोक नाईक हे एक बांधकाम व्यावसायिक असून बेळगावचे सरपंच आणि प्रसिद्ध वकील कै. पी. जे. नाईक यांचे चिरंजीव आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta