Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Spread the love

 

बेळगाव : शहरातील काकतीवेस येथील बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासण्याने नेत्र शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांचे विजय ऑर्थो ट्रॉमा सेंटर आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर पार पडले. यावेळी या शिबिरात रक्तदाब मधुमेह हाडांची ठिसूळ होता नेत्र तपासणी करण्यात आली, तसेच नागरिकांना विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जवळपास दीडशेहून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कंग्राळ गल्ली, नार्वेकर गल्ली आणि काकती वेस आदी भागातील नागरिक या शिबिराकरिता उपस्थित होते.

यावेळी मॉडर्न जिमचे संचालक किरण कावळे, बेळगाव जिम ओनर्सचे अध्यक्ष चेतन ताशीलदार, सचिव क्रितेश कावळे, सुरेश धामणेकर, संदीप बडवान्नाचे, अरुण पाटील, प्रकाश कुट्रे, अजय जाधव, महेश बडवान्नाचे, मीना बेनके, किरण कामूले, विशाल इंगोले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *