
बेळगाव : ताश्कंद येथील जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीटी) रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिने स्वीडन आणि नॉर्वेमध्ये रौप्य पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवीन आत्मविश्वास आणि धारदार कौशल्यांसह भारतात परतताना तनिष्का हिने बेंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या कर्नाटक राज्य मानांकन स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिने एनएमएस, 19 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील या सर्व गटांमध्ये सुवर्णपदक जिंकले असून महिला गटामध्ये कांस्य पदक मिळविले आहे. या पद्धतीने एकाग्रता, सातत्य आणि उत्कटतेचे एक चमकदार उदाहरण देणारी टिबल टेनिसपटू तनिष्का काळभैरव ही प्रत्येक सामन्यात आपल्या यशाचे शिखर उंचावत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta