
बेळगाव : नेगील योगी रयत सेवा संघ कर्नाटक बेळगाव शाखा यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहाय्यकानी शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला व सदर निवेदन लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच पिक विमा उतरवणाऱ्या कंपन्यांनी संबंधित शेतकऱ्यांना मध्यंतरी नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या निवेदनाद्वारे सरकार दरबारी मांडण्यात आल्या.
यावेळी बसवराज पागाद, सागनगौड पाटील, वीरभद्र तुरमुरी, बसवराज असुंडी, सुरेश नागनूर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta