
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरी इंटरनॅशनल वर्ष 2025-26 ची सुरुवात एक हृदयस्पर्शी सत्कार समारंभ घेऊन केली. ज्यामध्ये वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा लक्ष्मी भवन येथे गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. महादेव दिक्षित, डॉ. माधुरी दिक्षित, डॉ. देवगौडा इमगौडनावर, डॉ. सविता कड्डू,, सीए भागू दोयापडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष रोटे. ऍड. विजयालक्ष्मी मन्निकेरी, सचिव रोटे. कावेरी करूर, सहाय्यक गव्हर्नर रोटे. उदय जोशी, तसेच कार्यक्रम प्रमुख रोटे. शीला पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी क्लबने डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्सच्या समाजातील मोलाच्या योगदानाबद्दल आभार मानले आणि नव्या वर्षात सेवाभाव व सामाजिक उन्नतीसाठी पुनः एकदा वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.
रो. शिला पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta