
बेळगाव : माध्यमिक विद्यालय बेळवट्टी हायस्कूलच्या ई.स.२००३-०४ बॅचचे माजी विद्यार्थी कै.राजु पाटील राहणार बाकनुर यांचे आकस्मित निधन झाले व त्यांच्या कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला.
मात्र २००३-०४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मित्र कै. राजू पाटील यांच्या कुटुंबासाठी पालकत्वाची जबाबदारी घेतली आणि इयत्ता दहावीत शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी मयुरी राजु पाटील हिचा हायस्कूलचा सर्व आर्थिक खर्च उचलला, तसेच इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम क्रमांक पटकाविला तर 11 वीचा पण खर्च ही बॅच करणार. या माणुसकीच्या, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल आजी- माजी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटना, ईमारत बांधकाम कमिटी माध्यमिक विद्यालय बेळवट्टी यांच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta