Thursday , March 5 2026
Breaking News

सीमाप्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती!

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी 7 जणांची तज्ञ समिती जाहीर केली आहे. तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर खासदार धनंजय महाडिक यांची सहअध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या समितीत एकूण 7 जण आहेत.

या समितीमध्ये सदस्य म्हणून दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, मूळचे बेळगावचे असलेले महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ वकील राजाभाऊ पाटील, ऍड. महेश बिर्जे यांचा समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्य अप्पर सचिव असणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव वरिष्ठ सल्लागार दोघे असणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *