
बंगळूर : भाजप युवा मोर्चा सदस्य प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली.
एनआयएच्या पथकाने कतारहून आलेल्या आरोपी अब्दुल रहमानला आज कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आहे.
प्रवीण नेत्तारूच्या हत्येप्रकरणी एनआयएने आधीच २१ आरोपींना अटक केली आहे आणि आता आणखी एक प्रमुख आरोपी अब्दुल रहमानला अटक केली आहे.
तपासात असे दिसून आले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल रहमानने पीएफआय नेत्यांच्या निर्देशानुसार मुख्य हल्लेखोरांना आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांना स्वेच्छेने आश्रय दिला होता. एनआयएने त्याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
२६ जुलै २०२२ रोजी दक्षिण कन्नड जिल्ह्यात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या सदस्यांनी नेत्तारूची धारदार शस्त्रांनी हत्या केली. या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी अब्दुल रहमानला एनआयएने अटक केली आहे. नेत्तारू प्रकरणात एकूण २८ आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta