Friday , March 6 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा : संत मीरा, अनगोळ शाळेला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : गणेशपुररोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने पटकाविले. तर खानापूरच्या शांतीनिकेतन स्कूलला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले.
प्राथमिक गटातील मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने स्वामी विवेकानंद खानापूर शाळेचा 1-0 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य समन्यात संत मीरा अनगोळ शाळेने गजानन भातकांडे शाळेचा 3-0 असा पराभव केला, तर अंतिम लढतीत संत मीरा अनगोळ शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 1–0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या कर्णधार फरहान नदाफ यांनी एकमेव गोल केला.

माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचा 2-0असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात शांतीनिकेतन पब्लिक स्कूलने गजाननराव भातकांडे शाळेचा 2-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या आराध्याने दोन गोल केले तर अंतिम लढतीत संत मीरा अनगोळ शाळेने शांतिनिकेतन पब्लिक शाळेचा पेनल्टी शूटआउटवर 32 असा निसटता विजय संपादन केला विजयी संघाच्या साईराज कुराळे, अथर्व गावडे, अब्दुल मुल्ला, तर पराभूत संघातर्फे रितेश देसाई, रोहन गावकर यांनी गोल केले. तसेच संत मीरा शाळेच्या विजयात मोलाचा वाटा अब्दुल मुल्ला यांचा असून त्यांने शांतिनिकेतनचे 3 गोल आडवित विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महापौर मंगेश पवार, संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ नाईक, विनायक ग्रामोउपाध्ये, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी श्वेता पाटील, आशा भुजबळ, शिवकुमार सुतार, यश पाटील पंच मानस नायक आदित्य सानी, सोहम ताशिलदार, प्रणव देसाई ओमकार गावडे, हर्ष रेडेकर, आदी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *