
बेळगाव : मागील काही वर्षापासून युवा समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. हीच सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मातीतील खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पुढील महिन्यात भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा पुरुष खुला गट, बेळगाव जिल्हा मर्यादित (पुरुष) व महिला खुला गट अशा स्वरूपात भरविण्यात येणार आहेत. लवकरच या स्पर्धांची रूपरेषा आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे युवा समीतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta