
बेळगाव : आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 8.00 श्रीराम काॅलनी आदर्श नगर येथील मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे फलकाचे अनावरण महापौर श्री. मंगेश पवार व श्री राघवेंद्र रायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा. महापौरांनी स्वच्छतेबाबत सर्व नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचा संदेश देत, श्रीराम कॉलनी आदर्श नगर संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. बेळगांव शहर स्वच्छ ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये मी वैयक्तिक लक्ष घालत असल्याचे सांगितले. प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करून कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे, असाही संदेश दिला.
सदरचा फलक श्री. राघवेंद्र रायकर यांनी स्वखर्चाने तयार करवून दिला.
या प्रसंगी श्रीराम काॅलनी आदर्शनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव घोरपडे यांनी महापौर मंगेश पवार व श्री. राघवेंद्र रायकर यांचें गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
श्री. प्रदीप चव्हाण म्हणाले की, स्वच्छता कर्मचारी नियमितपणे आल्यास परिसर स्वच्छ राहील तसेच इतर नागरी सेवा सुरळीत सुरू राहतील. या प्रसंगी योग गुरू मुरुगेद पटृनशेटी, माजी अध्यक्ष विलास घाडी, प्रदीप जोशी, सेक्रेटरी सुधीर साम्बरेकर, खजिनदार राजाराम गुरव, उमेश वाळवेकर, परशुराम सुळेभावी, उपाध्यक्ष प्रकाश घाडी, कंग्राळकर, सोम शेखर मुस्तिगिरी, कुलकर्णी, हरी ओम मिरजकर, बिर्जे, उमाकांत कामुले, अर्चना भस्मे, मदन भस्मे, रणजित पवार, शंकर चौगुले, सामंत, इटी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta