
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे .
रेल्वे ओव्हर ब्रिजजवलील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. होणा-या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने खानापूर येथील म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील व देणगीदार उद्योजक विजय कंग्रालकर, शीतल वेसणे, शिक्षणप्रेमी दीपक किल्लेकर व संग्राम गोडसे उपस्थित राहणार आहेत.
तरी यशवंत विद्यार्थ्यांनी पालकांसह तसेच समाज बांधवांनीे वेळेवर उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta