Thursday , March 5 2026
Breaking News

बालवीर विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी….

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या गीताने झाली. त्यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर, प्रमुख अतिथी निता यल्लारी याच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देऊन गुरु प्रति आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सृष्टी पाटील या विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांनी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असलेले गुरु शिष्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर संयोजक शंकर चौगुले सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग समन्वयक भाग्यश्री कदम, माध्यमिक विभाग समन्वयक धनश्री सांगावकर, ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चौगुले या विद्यार्थिनींने केले तर आभार श्रावणी उघाडे या विद्यार्थिनीने मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *