
बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव तसेच वडगाव स्मशानभूमी रस्ता येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रकाशित केली होती. या बातमीची तात्काळ इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट कंट्रोल रूमने दखल घेत पथदीप दुरुस्त केले.
आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नव्हती यासंदर्भात “बेळगाव वार्ता”ने बातमी प्रसारित केली होती या बातमीची तात्काळ दाखल घेत संबंधित कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच सदर पथदीप दुरुस्ती करण्यात आले. त्यामुळे आनंद नगर भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta