
बेळगाव : राकसकोप येथील रहिवाशी कै. श्री. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी एस पाटील यांचे बुधवार दिनांक 9 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै बी एस पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. ते मराठा बँकेचे माजी संचालक होते. त्यांची ओळख राकसकोप पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी म्हणून होती. त्यांचा अनेक समाज उपयोगी कार्यात मोलाचा वाटा होता. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता राकसकोप येथे ग्रामस्थांच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले आहे. तरी कै बी एस पाटील यांच्या हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे राकसकोप ग्रामस्थ कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta