
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने नुकताच सीमाप्रश्नी तज्ञ समितीची पुनर्रचना केली तसेच कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्तीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा फतवा काढला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3-00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta