Sunday , December 7 2025
Breaking News

सखूबाईचं घर कोसळलं – रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा माणुसकीचा हात पुढे!

Spread the love

 

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/



बेळगाव : कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांचे घर ३० जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण संसार उध्वस्त झाला.
या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. सखूबाईंच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी ६० पोती सिमेंट, साडी व ब्लॅंकेट , शाल देण्यात आले.

यावेळी मदत वितरणावेळी क्लबचे अध्यक्ष शशिकांत नाईक, माजी अध्यक्ष मनोहर वाटवे, चंद्रकांत राजमाने, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर डी. बी. पाटील, तसेच सीमाकवी रवींद्र पाटील, मल्लाप्पा गुरव, परशराम काकतकर, लक्ष्मण कांबळे उपस्थित होते.

मनोहर वाटवे म्हणाले, “सखूबाईसारख्या गरजू महिलेला मदतीची अत्यंत गरज आहे. समाजाने माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला पाहिजे.”

सीमाकवी रवींद्र पाटील यांनी भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, “सखूबाईंच्या संसाराची भिंत कोसळली खरी, पण रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीची भिंत अधिक मजबूत झाली आहे.

यावेळी डी. बी. पाटील म्हणाले, “ही मदत म्हणजे केवळ सिमेंट नव्हे, तर उध्वस्त संसाराला उभं राहण्यासाठी दिलेला माणुसकीचा आधार आहे. समाजातील संकटग्रस्तांना साथ देणं हा आमचा सामाजिक धर्म आहे. रोटरी क्लब ही संस्था नसून समाजासाठी सतत कार्य करणारी संवेदनशील चळवळ आहे.”

शशिकांत नाईक यांनी सांगितले, “रोटरी क्लब नेहमीच समाजासाठी पुढाकार घेतो. पोलीओ निर्मूलन, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, आनंदायी शाळा, रक्तदान व चेक डॅमसारख्या उपक्रमातून आमचं कार्य अविरत सुरू आहे.”

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करत सखूबाई पन्हाळकर यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण जागवला आहे. आज त्यांचा संसार उघड्यावर असला तरी, माणुसकीच्या भक्कम भिंतीवर तो पुन्हा उभा राहणार याबाबत विश्वास निर्माण झाला आहे.

समाजातील गरजू, अपंग, विद्यार्थी व दुर्बल घटकांसाठी रोटरी क्लबने उभारलेले असे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *