Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूमध्ये आत्महत्या!

Spread the love

 

बेळगाव : दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बेळगाव तालुक्यातील एका तरुणीने बेंगळुरू येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वाती श्रीधर सनदी (मूळ नाव स्वाती अनंत केदार) असे तरुणीचे नाव आहे. ती मूळची मच्छे गावातील रहिवासी असून सध्या बेंगळुरू येथील के. आर. पुरम येथे पतीसोबत राहत होती. मृत स्वातीचा पती श्रीधर सनदी हा देखील मूळचा मच्छे येथील रहिवासी आहे. तो सध्या बेंगळुरूमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी सेक्टर) कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. लग्नापूर्वी स्वाती बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात सेवेत होती. स्वाती आणि श्रीधर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. याप्रकरणी स्वातीचे वडील अनंत केदार यांनी बेंगळुरू येथील के. आर. पुरम पोलीस ठाण्यात श्रीधर सनदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *