
बेळगाव : सालाबाद प्रमाणे आळवण गल्ली शहापूर येथील
श्री मंगाई देवस्थान यात्रा आज १८/०७/२०२५ रोजी अत्यंत सुरळीतपणे पार पडली. तसेच यात्रेत हजारोंच्या संख्येने भक्तांनी मंगाई देवीचा आशीर्वाद घेतला. सकाळी ठिक १२ वाजता गाऱ्हाणे उतरविन्यात आले. नैवेध दाखविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. तसेच गल्लीतील पंच मंडळ, युवक मंडळ, महिला मंडळ उपस्थित होते.
३० जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रम
दरम्यान आळवण गल्लीत ३० जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता १६ वेळा श्री शुक्त वेध पठण, देवीला अभिषेक कुंकुंमपुजा, महापुजा.
३१ जुलै दुपारी ३ वाजल्यापासून दुर्गा सप्तशती नवचंडी पाठ प्रारंभ होणार.
शुक्रवार दि. १ ऑगस्ट सकाळी ९ वाजता नवचंडी होम, स्वस्ती पुण्यावचन, सवै भक्त संकल्प, नवग्रह स्थापन पुजन, महामृत्यंजय देवता स्थापन पुजन, ब्रम्हदी मंडळ स्थापन पुजन, नवदुर्गा मंडळ स्थापन पुजन, नवचंडी होम, महामृत्यंजय होम, बली पुर्णावती, महानैवध महाआरती व सायंकाळी हळदी कुंकूम कार्यक्रम.
रविवार दि. ३ रोजी महाआरती १२.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, तरी भक्तांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून श्री मंगाई देवीचा आशिर्वाद घ्यावा.

Belgaum Varta Belgaum Varta