Thursday , March 5 2026
Breaking News

संजय शेट्टन्नावर यांची बदली रद्द; पुन्हा बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांची नुकतीच राज्य सरकारने सहकार खात्याच्या सचिवपदी बदली केली होती. मात्र, सदर बदली रद्द करण्यात आली असून तसा अधिकृत आदेश राज्य सरकारकडून शुक्रवार दि. १८ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.
अलीकडेच खाऊ कट्टा प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविल्याने ते राज्यभरात चर्चेत आले होते. त्यातच चार दिवसांपूर्वी त्यांची सहकार खात्याच्या सचिवपदी बदली करण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला होता. पण सदर आदेश रद्द करून त्यांची पुन्हा बेळगाव प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *