
बेळगाव : काल दि 19/07/2025 कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदी पात्रात एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्या टीमने तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. काल सायंकाळी झाल्याने मोहीम थांबवावी लागली. त्यानंतर आज सकाळी सुमारे 10:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शोधकार्य पुन्हा राबवण्यात आले.
शोधामध्ये अत्याधुनिक पाण्याखालील कॅमेऱ्यांचा वापर करून जवळपास दीड किलोमीटरपर्यंत पाण्याचा भाग तपासण्यात आला. मात्र, सदर व्यक्ती नेमकी कुठे पडली आहे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. काही नागरिकांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने शोध स्थान बरोबर निश्चित करता आले नाही. त्यामुळे टीमने स्वतःच्या अंदाजाने सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरात तपासणी केली.
या शोध मोहिमेत एचईआरएफ रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर, संतोष भंडारी, शशिकांत आंबेवाडकर, शैलेश पवार, प्रकाश पाटील अणि अनंत पाटील यांच्यासह संपूर्ण टीमने सहभाग घेतला. आज सायंकाळ होईपर्यंत प्रयत्न करूनही व्यक्तीचा ठावठिकाणा लागत नसल्याने मोहीम थांबविण्यात आली आहे. उद्या सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta