Tuesday , March 3 2026
Breaking News

तारांगण आयोजित निबंध स्पर्धेत प्रीती पठाणी प्रथम, अनिरुद्ध सुतार द्वितीय, संजना पाटील तृतीय

Spread the love

बेळगाव : बेळगावमध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवणारे महिलांचे हक्काचे व्यासपीठ तारांगणने जागतिक मराठी भाषा दिन औचित्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. आई एक दैवत, राष्ट्रीय एकात्मता, माझा आवडता समाज सुधारक, मराठी असे आमची मायबोली या निबंधाच्या विषयावर दहावीच्या विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक असे निबंध लिहिले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कलेला चालना मिळाली. या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. येळ्ळूरच्या महाराष्ट्र हायस्कूलची प्रिती पठाणी हिने प्रथम क्रमांक पटकावला. टिळकवाडी हायस्कूलचा अनिरुद्ध सुतार आणि मराठी विद्यानिकेतन बेळगावची संजना पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
उत्तेजनार्थ बक्षीस
विद्या प्रकाश पाटील (महाराष्ट्र हायस्कूल), कोमल सुभाष गावडे (उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल), चांगुणा ना. हंगिरकर (महाराष्ट्र हायस्कूल), कु. कुसूम नारायण काकतकर
(बालिका आदर्श विद्यालय), श्रावणी भांदुर्गे (सरस्वती हायस्कूल) हांदिगनुर यांनी पटकावली आहेत.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गोंधळी गल्ली येथील अपटेक एव्हिएशन सेंटरच्या सभागृहात दिनांक 15 मार्च 2022 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण व बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या स्पर्धेचे परीक्षक सी. वाय. पाटील व रणजीत चौगुले हेही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *