Sunday , July 26 2026
Breaking News

तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे : मंत्री उमेश कत्ती

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे, हीच माझी शक्ती असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. आज हुक्केरी विश्वनाथ सभाभवन येथे आयोजित आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री मल्लिकार्जुन स्वामीजी, तालुक्यातील अकरा श्रींच्या हस्ते मंत्री उमेश कत्ती यांना गौरविण्यात आले. मंत्रीमहोदयांनी पत्नी सौ. शीला उमेश कत्ती परिवाराचे सदस्य आणि मतक्षेत्रातील अभिमानींच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापला. गेल्या दोन दिवसांपासून अनेक मान्यवर, हजारो चाहते, अभिमानी यांच्याकडून मंत्रीमहोदयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
मंत्री उमेश कत्ती पुढे म्हणाले, गेल्या आठ विधानसभा निवडणुकीत मला सातत्याने विजयी करण्याचे सर्व श्रेय समस्त मतदार बंधू-भगिनींना द्यावे लागेल. तुम्हा सर्वांचं प्रेम विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, राजेंद्र पाटील, अशोक चंदापगोळ, श्रीकांत हतनुरी, अमर नलवडे सुनिल पर्वतराव, शिवानंद नेसरी, राजू बोरगांवी, सागर जकाते, नंदू मुडशी, रोहण नेसरी, चेतन बशेट्टी कुमार बस्तवाडी, जयगौडा पाटील, संकेश्वर हुक्केरी पालिकेचे सदस्य हिरण्यकेशी साखर कारखाना, संगम साखर कारखाना, विश्वराज शुगर्सचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी, अनेक मान्यवर चाहते अभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रीमहोदयांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेह भोजनाचा आस्वाद हजारो लोकांनी घेतला. उपस्थितांचे स्वागत माजी खासदार रमेश कत्ती यांनी केले. वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल कत्ती, पवन कत्ती, पृथ्वी कत्ती यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; कृष्णा-वेदगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

Spread the love  चिकोडी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी आणि निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *