
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ गावात एका पतीने पत्नी आणि सासऱ्या समोरच गळा चिरून आत्महत्या केली. मल्लप्पा कटबुगोळ (३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल मल्लप्पा कटबुगोळ हा घरातील तांदूळ विकून दारू पिऊन घरी आला. पत्नीशी वाद घालून रात्रभर भांडण केले आणि तिच्यावर हल्लाही केला.
पत्नीने तिच्या आपल्या भावाला फोन करून येण्यास सांगितले होते. यावेळी जावई मल्लप्पाने सासऱ्यावरही काठीने हल्ला केला करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
पण वैतागलेल्या मल्लप्पाने क्षणाचाही विचार न करता आपला गळा चिरून घेतला आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.
सासरा मल्लिकार्जुन याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस तपास करत आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta