बेळगाव : दिवसाढवळ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरटे पळून गेल्याची घटना बेळगावमधील आझम नगरमध्ये घडली.
पद्मजा कुलकर्णी (वय ७५) आज दुपारी ३-४ च्या सुमारास केएलई हॉस्पिटलच्या मागील रस्त्यावरून तिच्या नातवासोबत चालत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पद्मजा कुलकर्णी यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅमची चेन हिसकावून पळ काढला. दरम्यान, चेन हिसकावल्यानंतर धावाधाव करताना वृद्ध महिला जमिनीवर पडली आणि त्यांच्या मानेला, कोपराला आणि पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच, एपीएमसी पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोरांचा माग काढण्यासाठी सापळा रचला असल्याचे समजते.

Belgaum Varta Belgaum Varta