बेळगाव : नोकरीवरून काढून टाकल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मोदगा गावात घडली.
मृत युवकाचे नाव रवी विरणगौड हट्टीहोळी (वय २४) असे असून तो एमसीए पदवीधर होता. तो गेल्या वर्षभरापासून पुण्यातील एका ग्लोबल कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र, सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याला काही कारणांमुळे कंपनीतून कमी करण्यात आले होते. या धक्क्यातून सावरू न शकल्याने रवीने आपल्या मूळ गाव मोदग्यातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta