बेळगाव : बेळगावच्या विनायकनगरमध्ये राहणारी अपेक्षा किशन राठोड ही 4 वर्षांची चिमुरडी गंभीर हृदयविकाराने त्रस्त आहे. तिच्या हृदयाच्या झडपाला छिद्र असल्याचे निदान झाले असून, डॉक्टरांनी तातडीने “Redo MVR” (ओपन हार्ट सर्जरी) करण्याचा सल्ला दिला आहे.
अपेक्षा जन्मल्यापासूनच वारंवार आजारी पडत होती. यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली आहे, पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुन्हा तपासणी केली असता तिच्या हृदयाच्या झडपात छिद्र आढळले.
या शस्त्रक्रियेचा खर्च अंदाजे तीन ते चार लाख इतका असून, तिचे वडील किशन राठोड हे बेळगाव कॅम्पमध्ये मजुरीचे काम करतात. एवढा खर्च करणे त्यांच्यासारख्या गरीब कुटुंबाला शक्य नाही.
म्हणूनच आपण सर्व समाजहितैषी नागरिक, सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींना विनंती करतो –
या निरागस जीवासाठी मदतीचा हात पुढे करा.
देणगीसाठी बँक तपशील:
खातेदार: Kishan Rathod
खाते क्रमांक: 2912101003379
IFSC कोड: CNRB0002912
बँक: कॅनरा बँक, हनुमाननगर शाखा
फोनपे साठी 97400 97027
एक छोटासा हातभारही अपेक्षाच्या जीवाला संजीवनी ठरू शकतो.
चला, आपण सगळे मिळून तिचे आयुष्य वाचवूया.
Belgaum Varta Belgaum Varta