Friday , March 6 2026
Breaking News

सांबरा येथे 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

Spread the love


बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरुध्द कुर्डुवाडी आखाड्याचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार वि. मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अरुण भोंगार्डे, तिसऱ्या क्रमांकाची लढत शाहुपुरी तालमी कोल्हापूरचा अमोल बागव वि शिवराय आखाडा कुर्डुवाडीचा शुभम मुसळे यांच्यात होणार आहे.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी वि पवन चिकदिनकोप, पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि सुनील कवठेपिरान, सहाव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन येळ्ळूर वि अजिंक्य सांगली, सातव्या क्रमांकाची कुस्ती महादेव दऱ्यांन्नवर वि प्रेमनाथ कंग्राळी, आठव्या क्रमांकाची कुस्ती प्रवीण निलजी वि रणजित सांगली,
नवव्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगाव वि संकल्प कंग्राळी दहाव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार सावगाव वि गणेश कडोली यांच्यात होणार आहे.
त्याचप्रमाणे कुबेर पिरनवाडी वि शुभम कंग्राळी, महेश तिर्थकुंडे वि राहुल किणये, वैभव सांबरा वि रोहित माचीगड, किसन कंग्राळी वि रोहन कडोली, ओमकार मुतगा वि राहूल माचीगड यांच्यात आकर्षक कुस्त्या होणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *