बेळगाव : 2014 मध्ये बेळगाव येथे कर्नाटक प्रशासकीय न्यायधीकरणाच्या खंडपीठासाठी बेळगाव येथील वकिलानी आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या पैकी 14 वकिलांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर फौजदारी खटले मागे घेण्यास येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित वकिलांना दिलासा मिळाला आहे. आंदोलनकर्त्या वकिलांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करत मार्केट पोलीस स्थानकात आंदोलनात सहभागी झालेल्या 14 वकिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये मारुती कामाण्णाचे, आर.सी. इंगळे, रावसाहेब पाटील, निंगनगौडा पाटील, एस.एन. पत्तार, पी.एस. रंगोली, आदिल नदाफ, प्रभाकर पवार, एम. एल. मावीनकट्टी, ए. ए. मुल्ला, प्रभू यतनट्टी, सचिन शिवन्नवर आणि शिवाजी शिंदे यांचा समावेश होता. आंदोलनकर्त्या वकिलांनी सदर खटले मागे घेण्यासाठी वारंवार पाठ पुरवठा केला होता. सहायक अभियोजक महांतेश चलकोप्पा यांनी खटला चालवणाऱ्या न्यायालयातून हे खटले मागे घेण्याची परवानगी मागितली होती. न्यायाधीश श्री. गुरुप्रसाद यांनी ही मागणी मान्य करत खटले मागे घेण्यास परवानगी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta