बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे, तरी बेळगाव येथून खानापूरला रवाना होण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या सकाळी साडेदहा पर्यंत मराठा मंदिर कार्यालय येथे जमावे, खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे ठीक ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta