
बेळगाव : मुळचे रयत गल्ली आणि सध्या बिर्जे मळा, जुने बेळगाव येथील रहिवासी गंगाधर (बाळू) परशराम बिर्जे यांचे सोमवारी (ता. ४) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. श्री. बिर्जे वडगाव प्राथमिक कृषी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केले होते. बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे बिर्जे यांच्या अकाली निधनानिमित्त बुधवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती वडगाव, शहापूर व जुने बेळगाव शाखा, वडगाव प्राथमिक कृषी पतसंस्था, रयत गल्ली बाल भजन मंडळ, भारतनगर पंचमंडळ, जुने बेळगाव ग्रामस्थ कमिटी, वेदांत सोसायटी, साई गणेश सोसायटी, रयत गल्ली महिला मंडळ आणि वडगाव रयत गल्ली संघ यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta