
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील एका मशिदीत मौलवीने ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आणि पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
५ ऑक्टोबर २०२३ रोजी बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका मशिदीत एका मौलवीकडून बालिकेवर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलेली माहिती असलेला व्हिडिओ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पुनीत केरिहळ्ळी यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. या घटनेसंदर्भात महालिंगपूर येथील तुफेद दादाफिर (२२) याला हिंडलगा तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
या ऑडिओमध्ये मुलीच्या पीडित वडिलांनी घटनेची माहिती उघड केली आहे. शिवाय, मशिदीत घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. आरोपीला घटनास्थळावरून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुरगोड पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या सहकार्याने व्हिडिओला पुरावा मानत अधिकृत गुन्हा नोंदवला असून, आरोपीला अटक करून सखोल तपास सुरू केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta